रेल्वे प्रवासात झोप लागल्यास 'फोन' उठवणार

रेल्वेनं (Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना (Passengers) आता बिनधास्त झोपता येणार आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना झोप (Sleep) लागल्यास त्यांच्या निश्चित स्थानकापूर्वी (Fixed station) फोन केला जाणार आहे. आईआरसीटीसी (IRCTC) आणि बीपीओ (BPO) यांच्या संयुक्त विद्यामानं ही सुविधा सुरू होणार आहे. या सुविधेमुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाणार आहे.

रेल्वेनं प्रवास करत असताना अनेकदा प्रवाशांना झोप येत. गाडीमध्ये बसायला आरामदायक जागा मिळाल्यानंतर प्रवास करत असलेले प्रवाशी विश्रांती घेण्यासाठी डोळे बंद करतात. पण अशावेळी अनेकदा झोप लागते. परंतु, स्थानक निघून जाईल, या भितीनं प्रवासी झोपत नाही. मात्र, त्यांची ही समस्या (Issue) सोडविण्यासाठी तसंच, रेल्वेचा प्रवास आरामदायक बनवण्यासाठी रेल्वेने फोन कॉल (Phone call) सेवा दिली आहे.

हेही वाचा - मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी २ एसी लोकल दाखल

आईआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर या सेवेची माहिती देण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना १३९ या क्रमांकावर फोन लावावा लागणार आहे. या सेवेमार्फत स्टेशन येण्याच्या आधी म्हणजेच निश्चित स्थळाच्या अर्धा तास आधी प्रवाशांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर (Register Mobile number) फोन केला जाणार आहे. कॉल अर्लटद्वारे झोपलेल्या प्रवाशांना स्थानक आल्याची आठवण करून दिली जाणार आहे. या सेवेमुळं प्रवाशांना निवांत झोपता येणार आहे.

हेही वाचा - एसटी बसच्या खरेदीसाठी पैसे द्या- अनिल परब

या सुविधेसाठी प्रवाशांना आपला पीएनआर नंबर (PNR number), स्टेशनचं नाव (Station Name), स्टेशनचा एसटिडी कोड (Station STD coad) ही माहिती द्यावी लागणार आहे. प्रवाशांनी माहिती दिल्यानंतर सिस्टीम त्या ट्रेनच्या करंट स्टेटसची (Current Status) माहिती घेऊन सिस्टिमद्वारे वेकअप कॉल (Wake Up call) करण्यात येणार आहे. १३९ हा इंक्वाईरी नंबर असून, यात बदल करण्यात आले आहेत. ही सेवा अधिक विश्वसनीय करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. १३९ या क्रमांकावर रेल्वेचं रिजर्वेशन, सिट्सची उपलब्धता आणि ट्रेन प्लॅटफॉर्मची स्थिती याबाबत माहिती दिली जात आहे.


हेही वाचा -

मध्य रेल्वे चिंतेत, 'एसी' लोकलचे प्रवासीच वाढेना...

'तेजस'मध्ये अतिरिक्त सामान नेण्यावर बंदी


पुढील बातमी
इतर बातम्या