Advertisement

'तेजस'मध्ये अतिरिक्त सामान नेण्यावर बंदी

तेजस एक्स्प्रेसमध्ये अतिरिक्त सामान (Passengers) नेल्यास प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे.

'तेजस'मध्ये अतिरिक्त सामान नेण्यावर बंदी
SHARES

तेजस एक्स्प्रेसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. प्रवाशांना मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसमध्ये (Mumbai-Ahmadabad tejas Express) आवश्यक तेवढेच सामान (Luggage) घेऊन प्रवास करावा लागणार आहे. अतिरिक्त सामान (Passengers) नेल्यास प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणी अतिरिक्त सामान घेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशननं (IRCTC) घेतला आहे.

प्रवाशांना लांब-पल्ल्याच्या प्रवासासाठी अतिरिक्त सामान (Additional Luggage) घेण्याची सवय असते. एका प्रवाशाकडं अनेक बॅगा असल्यास बॅग गाडीतच राहणं किंवा प्लॅटफॉर्मवर विसरणं असे प्रकार घडतात. अनेकदा या प्रकारांमुळं आपत्कालीन साखळी ओढून गाडी थांबवण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळं या प्रकारांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी आयआरसीटीसीनं (IRCTC) रेल्वे सामान धोरणाची काटेकोरपणं अंमलबजावणी सुरू केली आहे.

रेल्वेच्या सामानाबाबतच्या नियमांनुसार, रेल्वेच्या एग्झिक्युटिव्ह डब्यात (Executive coach) ७० किलो वजनापर्यंतची बॅग नेण्याची मुभा आहे. तर चेअर डब्यात ४० किलोपर्यंत वजनाची बॅग नेण्याची सूट प्रवाशांना आहे.

तेजस एक्स्प्रेसमधील (Tejas Express) प्रवाशांकडे अतिरिक्त सामान आढळल्यास संबंधित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सामानाचं धोरण जुने आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसे. या धोरणानुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यात ३ अटेंडेंट नियुक्त केले आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना मदत करण्याची जबाबदारी त्यांच्याकडं आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सामानाची तपासणी करणं शक्य आहे. रेल्वे तेजस एक्स्प्रेसमध्ये गाडीला विलंब झाल्यास प्रवाशांना भरपाई देण्याची सुविधा असल्याचं आयआरसीटीसीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले.हेही वाचा -

'या' धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीच्या खर्चात वाढ

राणीच्या बागेत २ वाघांचं होणार आगमनसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा