Advertisement

'या' धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीच्या खर्चात वाढ

मुंबईतील रखडलेल्या धोकादायक पुलांच्या (dangerous bridge) पुनर्बांधणीच्या कामाला (Repairing Work) आता सुरुवात होणार आ

'या' धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीच्या खर्चात वाढ
SHARES

मुंबईतील रखडलेल्या धोकादायक पुलांच्या (dangerous bridge) पुनर्बांधणीच्या कामाला (Repairing Work) आता सुरुवात होणार आहे. यामध्ये अंधेरी येथील गोखले पूल (Gokhle Bridge) आणि पूर्व-पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यावरील २ उड्डाणपुलांची पुनर्बांधणी, पुलांवरील भार कमी करणं तसेच, घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाच्या विस्ताराचा समावेश आहे. मात्र, विलंबामुळं पुनर्बांधणीच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यानुसार, या कामांसाठी महापालिका (BMC) आता ४३७ कोटी रुपये खर्च करणार आहे.

अंधेरी पूर्व येथील गोखले पूल ३ जुलै २०१८ रोजी कोसळून २ लोकांचा मृत्यू झाला. तर १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस (CSMT) येथील हिमालय पादचारी पूल (Himalaya FOB) पडून ७ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमुळं मुंबईतील धोकादायक पुलांच्या दुरूस्ती करण्याच निर्णय घेण्यात आला.

अंधेरी (Andheri) पूर्व येथील गोखले पुलाच्या (Gokhle Bridge) बांधकामासाठी १३८ कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा पूल २६५ मीटर लांबीचा आणि २६.८ मीटर रुंदीचा असेल. (दोन्ही बाजूंना १.५ मीटरचे पदपथ) पूल आरसीसी स्ट्रक्चर (RCC Structure) आणि स्टिल गर्डरच्या (Still girder) माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वीचा ८९ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च होता.

सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता हा पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. विमानतळावर जाण्यासाठी या रस्त्याचा वापर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती करीत असतात. मात्र, या जोडरस्त्यावरील दोन्ही पूल जीर्ण झाल्यामुळं ते पाडून नव्यानं बांधण्यात येणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या जोडरस्त्याच्या कामांतर्गत संबंधित प्राधिकरणाकडूनच हे काम करून घेतलं जाणार आहे. या पुलाची रुंदी ४५.७ मीटर व लांबी ११० मीटर असून यासाठी ४५.०७ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर शिवाजीनगर जंक्शन, बैंगनवाडी जंक्शन, देवनार डम्पिंग ग्राउंड जंक्शनपर्यंतच्या उड्डाणपुलाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य उड्डाणपुलाच्या अबुटमेंट-ए-२ पासून ते मोहिते-पाटील येथील भुयारी वाहतूक मार्गापर्यंत उड्डाणपुलाचं काम विस्तारित करण्यात येणार आहे. परंतु, या कंत्राटाच्या किमतीत २४६ कोटींची वाढ झाली असून, एकूण कंत्राटाची किंमत ७१३ कोटींवर गेली आहे.हेही वाचा -

मेट्रोकडून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ही' अनोखी सुविधा

जीएसटी बुडवण्यासाठी गुजरातच्या व्यापाऱ्याचा हा पराक्रम, खावी लागली तुरूंगाची हवासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा