Advertisement

राणीच्या बागेत २ वाघांचं होणार आगमन

भायखळ्यातील जिजामाता उद्यान (Jijamata Udyan) म्हणजेच राणीच्या बागेत आता २ वाघांचे (tiger) आगमन होणार आहे. नर-मादीची ही जोडी आहे.

राणीच्या बागेत २ वाघांचं होणार आगमन
SHARES

भायखळ्यातील जिजामाता उद्यान (Jijamata Udyan) म्हणजेच राणीच्या बागेत आता २ वाघांचे (tiger) आगमन होणार आहे. नर-मादीची ही जोडी आहे. शक्ती आणि करिश्मा अशी यांची नावे आहेत. औरंगाबाद (Aurangabad) येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातून मंगळवारी हे वाघ आणण्यात येणार आहेत. वाघांच्या बदल्यात जिजामाता उद्यानातील चार ठिपकेदार हरणे  सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला देण्यात येणार आहेत.

 मुंबई (mumbai) सह सोलापूर प्राणिसंग्रहालयाने वाघाच्या नर-मादीची मागणी केली होती. पण मुंबईला हे वाघ (tiger) देण्यात येणार आहेत. शक्ती वाघाचा जन्म नोव्हेंबर २०१६ मध्ये तर करिश्मा वाघिणीचा जन्म २०१४ मध्ये झाला आहे. जिजामाता उद्यानात या वाघांसाठी विशेष सोय करण्यात आहे. या दोन वाघांच्या आगमानाने जिजामाता उद्यानात येणा-या पर्यटकांची संख्या आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याआधी मंगलोर प्राणिसंग्रहालयामधील बिबळ्या, कोल्हा, मोराची जोडी, सूरत प्राणिसंग्रहालयामधील अस्वल आदी राणीच्या बागेत दाखल झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवडयात राणीच्या बागेत बिबटया आणि तरसाची प्रत्येकी एक जोडी दाखल होणार आहे.हेही वाचा -

वजन कमी करण्याच्या गोळ्यांनी तरुणीचा मृत्यू

भंगारातल्या रिक्षा मुंबईच्या रस्त्यावर, अन् ...
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा