Advertisement

मध्य रेल्वे चिंतेत, 'एसी' लोकलचे प्रवासीच वाढेना...

प्रतिसाद मिळत नसल्यानं प्रवासी वाढवण्याचं मोठं आव्हान मध्य रेल्वेसमोर (Central Railway) आहे

मध्य रेल्वे चिंतेत, 'एसी' लोकलचे प्रवासीच वाढेना...
SHARES

मध्य रेल्वेच्या (Central Railway) ट्रान्स हार्बरवर धावणाऱ्या एसी लोकलच्या (AC Local) दिवसाला १६ फेऱ्या होतात. या लोकलची (Local) प्रवासी क्षमता जास्त असूनही प्रवाशांचा तितका प्रतिसाद मिळत नाही. या एसी लोकलच्या प्रत्येकी फेरीत सरासरी ८० ते ९० प्रवासी प्रवास करतात. तिकीट काढतानाच काही प्रवाशांनी पासही काढला आहे. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्यानं प्रवासी वाढवण्याचं मोठं आव्हान मध्य रेल्वेसमोर (Central Railway) आहे. 

या एसी लोकलचं तिकीट (AC Local Ticket) दर जादा असल्यानं प्रवासी फिरकणार कसं, अशी भिती मध्य रेल्वे प्रशासनाला आहे. त्यामुळं प्रतिसाद वाढवण्यासाठी नवी मुंबईतील बहुराष्ट्रीय कंपन्या व मॉलमधील दुकानदार, विविध छोटी खासगी कार्यालयं यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे.

सामान्य प्रवासी (Passengers) कितपत या लोकल प्रवासाकडं वळेल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळं कंपन्या (Company) आणि मॉलमध्ये (Mall) जाऊन एसी लोकल प्रवास, त्याचं तिकीट दर याची माहिती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, काम सुरू केलं आहे. आतापर्यंत ८ मॉल आणि ४ बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवर आता आणखी ५ लोकल मध्य रेल्वेच्या (Central Railway) ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरी एसी लोकलही (AC Local) दाखल झाली असून, ती कळवा कारशेडमध्ये आहे. ही लोकल सध्या तरी अतिरिक्त म्हणून असणार आहे. सध्या सेवेत असलेली एक लोकल देखभाल-दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये जाताच दुसऱ्या लोकलचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी २ एसी लोकल दाखल

'तेजस'मध्ये अतिरिक्त सामान नेल्यास कारवाई



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा