Advertisement

एसटी बसच्या खरेदीसाठी पैसे द्या- अनिल परब

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने २००० साध्या परिवर्तन (लालपरी) बसेस खरेदी करण्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करावी,

एसटी बसच्या खरेदीसाठी पैसे द्या- अनिल परब
SHARES

यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2020-21) एसटी महामंडळाला २००० साध्या (लालपरी) बसेस खरेदी करण्यासाठी शासनानं सुमारे ६०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी केली आहे. या संदर्भातील प्रस्ताव त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या एसटी महामंडळाच्या (MSRTC) संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

मागील वर्षी शासनानं ७०० साध्या बसेस (Bus) खरेदी करण्यासाठी महामंडळाला निधी देण्याचं मान्य केलं होतं. त्यानुसार, महामंडळानं १८६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडं केली होती. त्यापैकी शासनानं ११० कोटी रुपये एसटी महामंडळाला (MSRTC) दिले असून, प्रस्तावित ७०० बसेस एसटीच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झाल्या आहेत.

गाव ते तालुका, गाव ते जिल्हा अशा सुमारे ६० किलोमीटरच्या परिघामध्ये एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. एसटीच्या एकूण प्रवासी संख्येपैकी तब्बल ९० टक्के प्रवासी या परिघामध्येच प्रवास करतात. या प्रवासीवर्गाला एसटीची लालपरी म्हणजेच साधी परिवर्तन बस अविरत सेवा देत आहे.

या सेवेचा दर्जा आणखीन उंचावण्याच्या दृष्टीनं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने २००० साध्या परिवर्तन (लालपरी) बसेस खरेदी करण्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करावी, असा प्रस्ताव एसटी महामंडळानं शासनाला सादर केल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.हेही वाचा - 

दिल्लीकरांनी भाजपचा अहंकार उतरवला- अनिल परब

‘आप’च्या मुंबई कार्यालयातही जल्लोष, विजयाच्या हॅटट्रीकमुळे कार्यकर्ते खूषसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा