RPF ने मिलाया बिछड़ो को

 Borivali
RPF ने मिलाया बिछड़ो को

बोरीवली - बोरीवलीच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर 12.30 वाजताच्या दरम्यान ड्युटीवर असलेल्या कॉन्स्टेबल नितेश यादव यांना कुणाल सिंह नावाचा मुलगा सापडला. त्याला विचारपूस केल्यानंतर तो आपल्या कुटुंबासह वापी फिरायला अाल्याचं कळलं. त्यानंतर तो आपल्या मामासह बोरीवलीला आला. त्याचा मामा तिकीट काढायला गेला, पण तीन तास उलटूनही तो परतलाच नाही. त्यानंतर याची माहिती शिफ्ट इंचार्ज आरपीएफ अधिकारी निर्मल सिंह यांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर मुलाला बोरीवली ऑफीसमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर कुटुंबाशी संपर्क केला. मुलाच्या वडिलांची चौकशी केली आणि मुलाला त्यांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर मुलाच्या कुटुंबियाने पोलिसांचे आभार मानले.

Loading Comments