Advertisement

'राज्य सरकरने दारुबंदीवर पर्याय काढावा'


'राज्य सरकरने दारुबंदीवर पर्याय काढावा'
SHARES

वडाळा - हायवेपासून 500 मीटरच्या आत असलेल्या दारू दुकानांवर बंदी आणण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर राज्य सरकारने पर्याय काढावा अशी मागणी सोमवारी वडाळा पश्चिम येथील इंडियन असोसिएशन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट (आहार) च्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी केली आहे. 

महामार्गावर होणाऱ्या अपघातांसाठी मद्य कारणीभूत ठरत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि महामार्गावरील दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने 1 एप्रिल 2017 पासून सुरू केली असून, हायवेपासून 500 मीटर अंतरावर दारुविक्रीला बंदी घातल्याने राज्यातील तब्बल 25 हजार बार आणि परमिट रूमपैकी 10 हजार बार आणि परमिट रुम 1 एप्रिलपासून बंद आहेत. त्यामुळे येथे काम करणाऱ्या वेटर आणि इतर कामगार तसेच राज्यातील 9 लाख लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत 200 मीटरच्या आतील सर्व बार, बिअर शॉप आणि दारू दुकानं बंद करण्यात येत आहेत. महामार्गालगत असलेल्या जवळपास 15 हजार बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. कायदेशीररित्या परवाने धारक असतानाही बार अॅण्ड रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली आहे. यामुळे अनधिकृत व्यवसायांना अभय मिळणार असल्याचा संतप्त सवाल शेट्टी यांनी केला. तसेच ज्याप्रमाणे इतर राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महामार्ग हस्तांतरित करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पर्याय काढला तसा पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फंडणवीस यांनी काढावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा