मुंबई लाईव्हच्या बातमीचा दणका

  Pali Hill
  मुंबई लाईव्हच्या बातमीचा दणका
  मुंबई  -  

  वांद्रे - खड्डे पडून वांद्रे पूर्वेकडील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. ही बातमी मुंबई लाईव्हने दाखवल्यानंतर महापालिकेकडून याची दखल घेण्यात आली आहे. या रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्यात आले आहे.

  गणेशोत्सवापूर्वीच सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करणार असल्याचे आश्वासन महानगर पालिकेच्यावतीने देण्यात आले होते. मात्र गणेशोत्सवाला 5 दिवस उलटून गेल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच होती. त्यामुळे गणेश विसर्जनापर्यंत पालिकेने खड्डे बुजवले नाहीत तर या खड्ड्यांमध्येच गणपती विसर्जन करण्याचा इशारा अनेक मंडळांनी दिला होता. यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे सफाई कामगार नेते राजेश रिडलान यांनी मुंबई लाईव्हचे आभार मानले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.