Advertisement

पोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी? उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे व्यथित होऊन अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पोलिसांच्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी? उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल
SHARES

पोर्न व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला (Raj Kundra Case) अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे व्यथित होऊन अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं (Shilpa Shetty) मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) धाव घेतली होती. पण, मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कशा असू शकतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला.

राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर प्रसार माध्यमात येत असलेले शिल्पा शेट्टीचे नाव यामुळे आपली बदनामी  (Defamation Case) होते, असा दावा शिल्पा शेट्टीनं न्यायालयात केला होता. यावरुन बराच वेळ न्यायालयात युक्तीवाद देखील झाला.

मात्र, तुम्ही एक सेलिब्रिटी आहात लोकांना तुमच्याबद्दल वाचायला आवडतं, म्हणून लिहिलं जातंय. तसंच तुमच्याशी संबंधीत काही घडतंय आणि त्याबद्दल जर लिहिले गेले असेल तर त्यांवर तुम्ही बंधने आणण्याची मागणी कशी काय करू शकता? असा उलट प्रश्नच न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला.

आता तुमच्या बद्दल काही चांगलं लिहीयाचं की काहीच लिहू नका, हे आम्ही कसं सांगू शकतो', अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केलं.

तसंच, या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेल्या सर्वांना १८ ऑगस्टपर्यंत तर शिल्पा शेट्टीला २६ ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आता पुढील सुनावणी २० सप्टेंबर नंतर होणार आहे.

‘आपला लोकशाही देश आहे. इथं अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रसार माध्यमांना देखील पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण पत्रकारीता ही विश्वासहार्य आणि जबाबदारीनं केली पाहिजे हे ही तितकंच खरं आहे', असं सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गौतम पटेल यांन स्पष्ट केलं.

यावर, 'आम्ही कोणावर बंदी घालण्याची मागणी करत नाही, मात्र वार्तांकन करताना वैयक्तिक पातळीवर टिका टिप्पणी नसावी असा युक्तीवाद शिल्पा शेट्टीच्या वतीनं करण्यात आला.



हेही वाचा

अनुराग कश्यपची शॉर्ट फिल्म 'घोस्ट स्टोरीज' अडकली वादाच्या भोवऱ्यात

शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला सेबीकडून ३ लाखांचा दंड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा