Advertisement

शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला सेबीकडून ३ लाखांचा दंड

पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राचे बँक खाते आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली आहे.

शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला सेबीकडून ३ लाखांचा दंड
SHARES

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, त्यांच्यापुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांना सेबीने ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या वियान इंडस्ट्रीजने इनसायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे सेबीने ही कारवाई केली आहे. शिल्पा आणि राज कुंद्रा हे दोघेही विवान इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आहेत. विवान इंडस्ट्रीजने ऑक्टोबर २०१५ मध्ये प्रिफ्रेन्शियल अलॉटमेंटद्वारे ५ लाखांचे शेअर चार जणांना दिले. त्यामधून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना २.५७ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याबाबत वेळेवर माहिती दोघांनी जाहीर केली नाही. 

पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राचे बँक खाते आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली आहे. कुंद्रा याचे बँक खाते आणि विवान इंडस्ट्रीजचे संयुक्त खाते, ज्यात शिल्पा शेट्टी दिग्दर्शक होत्या, याचीही चौकशी सुरु आहे. 

राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.  कोठडीची मुदत २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. मंगळवारी राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मुदत संपली, तेव्हा त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी  त्याला १४ दिवसांची न्यायालयीन सुनावण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा