Advertisement

'ज्युनिअर' अजय देवगणचं यंग इंडियाला चॅलेंज!


'ज्युनिअर' अजय देवगणचं यंग इंडियाला चॅलेंज!
SHARES

केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्यापासून सुरू झालेला फिटनेस चॅलेंज ट्रेंड अवघ्या काही वेळातच बॉलिवुडपर्यंत पोहोचला. अनुष्का शर्मा, ऋतिक रोशन, आलिया भट्ट, वरूण धवन या बॉलिवुड कलाकारांसोबतच आता अभिनेता अजय देवगणचं नावही या यादीत समाविष्ट झालं आहे. पण ते त्याने स्वत: केलेल्या चॅलेंजमुळे नसून त्याच्या ८ वर्षांच्या मुलामुळे आहे!'धाकट्या मालकां'चं यंग इंडियाला चॅलेंज!

अजय देवगणने नुकताच त्याचा ८ वर्षांचा मुलगा युगचा एक व्हिजिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये युग देवगण स्वत: फिटनेसच्या कसरती करून चॅलेंज देत आहे. पण हे चॅलेंज त्याने दुसऱ्या कुठल्या बॉलिवुड अभिनेत्याला दिले नसून थेट यंग इंडियाला हे चॅलेंज दिलं आहे. अजय देवगणने या व्हिडिओसोबत 'युग संपूर्ण यंग इंडियाला हम फिट तो इंडिया फिट हे चॅलेंज देत आहे' असं ट्विटदेखील केलं आहे.


याला पाहून तोंडात बोटं घालाल!

या व्हिडिओमध्ये युग करत असलेल्या कसरती बघितल्या, तर भले भले जिम्नॅस्ट्सही तोंडात बोटं घालतील! फक्त पुशअप्सच नाहीत, तर जिममधले इतरही प्रकार युग करताना दिसतोय. त्यामुळे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं या 'ज्युनिअर देवगण'ने आत्ताच आपले कलागुण दाखवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लवकरच युगसुद्धा बॉलिवुडमध्ये पदार्पण करताना दिसला तर नवल वाटायला नको!


 


'टोटल धमाल'चं शुटिंग सुरू

अजय देवगणबद्दल बोलायचं झालं, तर 'रेड' हा अजय देवगणचा शेवटचा चित्रपट होता. सध्या अजय 'टोटल धमाल' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अजयसोबत धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने आणि अनिल कपूर स्क्रिन शेअर करणार आहेत.हेही वाचा

२० वर्षांनंतर अर्जुन रामपालचा संसार मोडला!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement