Advertisement

अभिनेता कार्तिक आर्यन कोरोना पॉझिटिव्ह

रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, सतीश कौशिक यांच्यासह अनेक कलाकारांना आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

बॉलिवूडच्या कलाकारांवर कोरोना विषाणूचा विळखा (Corona virus infection) वाढतचं चालला आहे. रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, सतीश कौशिक यांच्यासह अनेक कलाकारांना आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आता यामध्ये आणखी भर पडली आहे.

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो कार्तिक आर्यनलाही (Kartik Aaryan tested corona positive) कोरोना विषाणूची लागण (corona Positive) झाली आहे. याबाबतची माहिती कार्तिकनं स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.

त्यानं इन्स्टाग्रामवर लिहिलं की, 'कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, प्रार्थना करा' यासोबतचं कार्तिकनं बीग प्लस चिन्हाचा फोटोही शेअर केला आहे. त्यानं या पोस्टच्या माध्यमातून कोरोनातून बरा होण्यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्यास सांगितली आहे. कार्तिकच्या या पोस्टवर त्याचे असंख्य चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकं त्याच्या बरे होण्याची  प्रार्थना करताना दिसत आहेत.

अवघ्या दोन दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन लॅक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर मनीष मल्होत्रासाठी वॉक करताना दिसला आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील रॅम्प वॉक करताना दिसली आहे. त्यामुळे बॉलिवूडचे इतर कलाकारही कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे.

कार्तिककडे सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. यामध्ये 'धमाका', 'भूल भुलैय्या 2', 'दोस्ताना 2' अशा बड्या चित्रपटांचा समावेश आहे.

कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘भूल भुलैय्या 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. पण आता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे पुढील काही काळ या चित्रपटाचं शूटिंग थांबवलं जाऊ शकतं. अलीकडेच त्यानं 'भूल भुलैय्या 2' च्या सेटवरून तब्बू आणि कियारा अडवाणीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ते सर्वजण मास्क परिधान केलेले दिसले होते.

याशिवाय पुढील आठवड्यापासून कार्तिकला जान्हवी कपूरसोबत 'दोस्ताना 2' या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करायची होती. त्यामुळं या चित्रपटाचं वेळापत्रकही लांबण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील आणखी एक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा