Advertisement

रणवीर-आलियाच्या 'गली बॉय'चा ट्रेलर प्रदर्शित


रणवीर-आलियाच्या 'गली बॉय'चा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

अभिनेता रणवीर सिंगचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा गली बॉय चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करम्यात आला आहे. या चित्रपटात रणवीरसोबत आलीया भट झळकणार असून पहिल्यांदाच ही जोडी चित्रपटात पाहता येणार आहे. मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून प्रेक्षकांकडून ट्रेलरला चांगलीच पसंती मिळत आहे.


Wohooooo!! #GullyBoyTrailer out now!! https://t.co/hAbSFo8cdY@ritesh_sid #ZoyaAkhtar@FarOutAkhtar #TigerBaby @RanveerOfficial @aliaa08 @ZeeMusicCompany@excelmovies

— Alia Bhatt (@aliaa08) January 9, 2019


दमदार अभिनय

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नाव कमावणाऱ्या डिवाईन म्हणजे विवियन फर्नांडिस आणि रॅपर नॅझी म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून गली बॉयची कथा प्रेरीत आहे. तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रणवीर आणि आलिया यांच्या दमदार अभिनयाची झलक दिसते. याशिवाय चित्रपटातील डायलॉग आणि पार्श्वसंगीतानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

मराठमोळी अभिनेत्री

रणवीर आणि आलीयासोबत चित्रपटात एक मराठी अभिनेत्री पण झळकली आहे. अभिनेत्री अमृता सुभाष यामध्ये रणवीरच्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा