Advertisement

रौप्य पदक विजेती मीराबाई चानूची घेतली सलमाननं भेट, फोटोमुळे झाला ट्रोल

मीराबाई मात्र अभिनेता सलमान खानची मोठी चाहती असून त्याला भेटायची तिची इच्छा होती.

रौप्य पदक विजेती मीराबाई चानूची घेतली सलमाननं भेट, फोटोमुळे झाला ट्रोल
SHARES

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूला भेटायचे अनेकांचे स्वप्न आहे. दरम्यान, अनेक सेलेब्स मीराबाई चानूचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपाने अभिनंदन करत आहेत. मीराबाई मात्र अभिनेता सलमान खानची मोठी चाहती असून त्याला भेटायची तिची इच्छा होती.

जेव्हा सलमान खानला मीराबाईच्या इच्छेबद्दल समजलं तेव्हा त्यानं तिची भेट घेण्याचं ठरवलं. नुकतीच मीराबाई आणि सलमान यांची भेट झाली. या भेटीचा एक फोटोदेखील सलमान खाननं शेअर केला आहे.

फोटो शेअर करत सलमान खाननं लिहिलं की, "रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानूसाठी मी खूप आनंदी आहे. तिच्यासोबतची एक प्रेमळ भेट... माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत आहेत."

या फोटोमध्ये सलमान खानच्या गळ्यात एक शॉल दिसतेय. ही शॉल मीराबाईने या भेटीदरम्यान सलमानला भेट म्हणून दिली आहे. सलमानसोबतच्या भेटीचा आनंद यावेळी मीराबाईच्या चेह-यावर स्पष्ट झळकतोय.

सलमान खानच्या पोस्टवर कमेंट करताना मीराबाई चानूनं लिहिलं, "सलमान खान सरांचे खूप खूप आभार. मी तुमची मोठी चाहती आहे आणि तुम्हाला भेटणे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होतं."

यापूर्वी एका मुलाखतीत मीराबाईनं सांगितलं होतं की, ती सलमान खानची मोठी चाहती आहे. ती म्हणाली होती, “सलमान मला खूप आवडतात, त्यांचे बॉडी स्ट्रक्चर मला खूप आवडते.”

सलमान खानच्या आधी सचिन तेंडुलकरनेही मीराबाई चानूला भेटून तिचं अभिनंदन केलं होतं. या भेटीचा फोटो सचिननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा