Advertisement

शाहिदच्या 'जर्सी'सोबत होणार अक्षयच्या 'पृथ्वीराज'ची टक्कर

यंदा दिवाळीत अक्षय आणि शाहिदच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

शाहिदच्या 'जर्सी'सोबत होणार अक्षयच्या 'पृथ्वीराज'ची टक्कर
SHARES

यशराज फिल्म्सनं त्यांच्या पाच मोठया चित्रपटांच्या रिलीज डेट जाहिर केल्या आहेत. यानुसार अभिनेता अक्षय कुमार स्टारर पृथ्वीराज हा चित्रपट यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

विशेष म्हणजे याच दिवशी शाहिद कपूर स्टारर जर्सी हा चित्रपटदेखील रिलीज होतोय. त्यामुळे यंदा दिवाळीत अक्षय आणि शाहिदच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

शाहिद कपूरच्या 'जर्सी'बद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची रिलीज डेट स्वतः शाहिदनं १७ जानेवारी रोजी सोशल मीडियावर जाहिर केली होती. चित्रपटात शाहिद एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका मूळ चित्रपटात नानीनं साकारली होती. 'जर्सी'च्या दिग्दर्शनाची धुरा गौतम तिनोरी यांनी सांभाळली आहे.

यशराज फिल्म्सनं त्यांचे ५ मोठे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितलं आहे. यशराजनं सोशल मीडियावर २०२१ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी शेअर केली आहे.

पहिला चित्रपट 'संदीप और पिंकी फरार' हा आहे. हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. दिबाकर बॅनर्जी हे दिग्दर्शक आहेत.

दुसरा चित्रपट 'बंटी और बबली २' हा आहे. हा चित्रपट येत्या २३ एप्रिल रोजी रिलीज होईल. या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. तर शरवरी ही या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण व्ही शर्मा आहेत.

तिसरा चित्रपट म्हणजे 'शमशेरा'. हा चित्रपट २५ जून रोजी रिलीज होईल. या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त हे मुख्य भूमिकेच आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केलं आहे.

चौथा चित्रपट 'जयेशभाई जोरदार' हा आहे. तो २७ ऑगस्ट रोजी रिलीज होईल. या चित्रपटात रणवीर सिंग, शालिनी पांडे, बोमन इराणी आणि रत्ना पाठक शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिव्यांग ठक्कर हे याचे दिग्दर्शक आहेत.

पाचवा चित्रपट 'पृथ्वीराज'. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज होईल. अक्षय कुमार, सोनू सूद, संजय दत्त आणि मानुषी छिल्लर यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शक डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी हे आहेत.



हेही वाचा

वेब शो ‘मत्स्यकांड’ मध्ये रवी दुबे नायकाची भूमिका साकारणार

१९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार बहुचर्चित 'कानभट्ट'

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा