Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

१९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार बहुचर्चित 'कानभट्ट'

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचा झेंडा फडवकत विविध पुरस्कार आपल्या नावे करणारा 'कानभट्ट' हा बहुचर्चित सिनेमा १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

१९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार बहुचर्चित 'कानभट्ट'
SHARES

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचा झेंडा फडवकत विविध पुरस्कार आपल्या नावे करणारा 'कानभट्ट' हा बहुचर्चित सिनेमा १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं बऱ्याच नवनवीन गोष्टी घडल्या असून, कदाचित याच देश-विदेशातील ज्युरी आणि समीक्षकांना भावल्या असाव्यात. याच कारणामुळं त्यांनी 'कानभट्ट'वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

या सिनेमाच्या दिग्दर्शिका आणि शीर्षक भूमिकेतील अभिनेता या दोघांचाही हा पहिलाच सिनेमा असून, त्यांनी उत्तम कामगिरी बजावत 'कानभट्ट'च्या माध्यमातून जगभरातील सिनेरसिकांचं लक्ष आपल्याकडं वेधण्यात यश मिळवलं आहे. अपर्णा एस. होशिंग यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, भव्य शिंदे या तरुण अभिनेत्यानं यात 'कानभट्ट' साकारला आहे. सिनेमा रसिक दरबारी पोहोचत असल्यानं दोघांनीही सिनेमाबाबत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

दिग्दर्शिका अपर्णा होशिंग - 'कानभट्ट'ची कथा एका लहान मुलाभोवती गुंफण्यात आली असून सिनेमाच्या कथानकात वेद, विज्ञान आणि नशीब यांची अचूकपणे सांगड घालण्यात आली आहे. दिग्दर्शिका म्हणून अपर्णा यांचा हा पहिलाच सिनेमा असला तरी त्यांनी हिंदीमध्ये 'जीना है तो ठोक ताल', 'उपपटांग' आणि नील नितीन मुकेश अभिनीत 'दशहरा' या हिंदी सिनेमांची निर्मिती केली आहे. 

मराठी सिनेमाद्वारे दिग्दर्शनाकडे वळण्याबाबत अपर्णा म्हणाल्या की, आज मराठी सिनेसृष्टी एका महत्त्वाच्या टप्प्यावर असून, संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्यात यशस्वी ठरली आहे. मराठी माझी मातृभाषा असल्याचा मला अभिमान आहे. 

मी महाराष्ट्रात वाढले आहे. त्यामुळे पहिला मराठी सिनेमाच दिग्दर्शित करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार 'कानभट्ट' तयार केला आहे. या सिनेमात एका अशा विषयाला हात घालण्यात आला आहे ज्याच्याकडे आजवर कोणाचंच लक्ष गेलेलं नाही. आज आपण विज्ञानाच्या बळावर खूप प्रगती केली असली तरी वेदांचं महत्त्व विसरून चालणार नाही. सर्वांचा पाया वेद आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

हेही वाचा- 'कानभट्ट'ने १५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कारांवर उमटवली मोहोर

या सिनेमाचं चित्रीकरण हरीद्वारमध्ये करण्यात आलं आहे. दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखांभोवती या सिनेमाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या भव्य शिंदे आणि ऋग्वेद मुळे यांनी अचूक कामगिरी बजावत मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. आमच्या टीमनं घेतलेली मेहनत जगभरातील दिग्गजांनी पाहिली असून, भारतीय प्रेक्षकही सिनेमागृहांमध्ये जाऊन याचा अनुभव घेतील याबाबत खात्री आहे.

अभिनेता भव्य शिंदे - 'कानभट्ट'मध्ये शीर्षक भूमिकेत असलेला भव्य शिंदे एक उदयोन्मुख अभिनेता आहे. आजवर लहान सहान भूमिका साकारणाऱ्या भव्यसाठी 'कानभट्ट'सारखा मोठा कॅनव्हास लाभणं ही खूप मोठी बाब आहे. कानभट्ट ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अपर्णा यांना कोणतीही इमेज नसलेला चेहरा हवा होता. टिपीकल ब्राम्हणी लुक असलेला कलाकार त्यांनी काढलेल्या व्यक्तिरेखांच्या स्केचेसमध्ये कुठेच बसत नव्हता. यासाठी त्यांनी आॅडीशन्स घेतल्या आणि त्यातून त्यांना भव्य शिंदे सापडला. 

याबाबत भव्य म्हणाला की, या सिनेमाचं कथानक वेद, विज्ञान आणि डेस्टिनी म्हणजेच नशीबावर आधारीत आहे. माझ्यासाठी ते खरं ठरलं. कारण आपल्याला इतका मोठा रोल साकारण्याची संधी मिळेल असा विचारही मी आॅडीशनला जाताना केला नव्हता. हे केवळ नशीबात होतं म्हणून मला मिळालं. आॅडीशनमध्ये मी केवळ माझा १०० टक्के परफॅार्मंस देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तोच मुख्य भूमिका मिळण्यासाठी कामी आला. 

टायटल रोल साकारताना सुरुवातीला थोडा नर्व्हस होतो, पण अपर्णा मॅडमने रिलॅक्स केलं. त्या खूप कॅान्फिडन्ट आहेत. त्यांचं व्हिजन क्लियर होतं. त्यानुसारच त्यांनी सिनेमा बनवला आहे. त्यांनी माझ्यावर अशी काही जादू केली की मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली. त्यांनी माझ्यातील पॅावर जागवली, फ्रीडम दिलं आणि गाईड केल्यानं 'कानभट्ट' मधील टायटल रोल अगदी सहजपणं साकारू शकलो.

(marathi movie kaanbhatt will release on 19th february 2021 in maharashtra)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा