Advertisement

अखेर अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारने शेअर केलेल्या टीझरमध्ये सुरुवातीला सूर्यवंशी चित्रपटाचा ट्रेलर २ मार्च २०२० मध्ये लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र कोरोनामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

अखेर अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार
SHARES

अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. अक्षयने ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा एक टीझर ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करत म्हटलंय, ‘आम्ही वचन दिल्याप्रमाणे तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये भेटणार आहोत… आता ती वेळ आली आहे. आ रही है पुलिस! सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात ३० एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.’

अक्षय कुमारने शेअर केलेल्या टीझरमध्ये सुरुवातीला सूर्यवंशी चित्रपटाचा ट्रेलर २ मार्च २०२० मध्ये लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र कोरोनामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आम्ही प्रेक्षकांना वचन दिले होते की योग्य वेळ येताच सूर्यवंशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार. जवळपास एक वर्ष उलटले आहे. आता सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात चित्रपटगृहांमध्ये ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त अभिनेता रणवीर सिंग, अजय देवगण, कतरिना कैफ आणि जॅकी श्रॉफ हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.‘सूर्यवंशी’ दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा हा तिसरा चित्रपट. यापूर्वी सिंघम आणि  सिम्बा रोहित शेट्टीने बनवले आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा