Advertisement

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे.

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण
SHARES

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. 'हॅलो, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर मी स्वत:ला विलग करुन घेतलं असून सध्या मी होम क्वारंटाईन आहे. कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल्स आणि डॉक्टरांच्या सूचनेचे मी पालन करत आहे. तुमच्या प्रेम आणि आधाराबद्दल धन्यवाद, सर्वांनी काळजी घ्या', असं आलिया भट्टनं यात म्हटलं आहे.

आलिया भट्ट सध्या तिच्या ३ आगामी चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यात दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या दोन चित्रपटामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. या शिवाय ती रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र या चित्रपटातही दिसणार आहे.

अनेक बॉलिवूड स्टार कोरोनाबाधित

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. आमिर खान, कार्तिक आर्यन, परेश रावल यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाबाधित झाले आहेत. तर आर माधवनने मजेशीर पद्धतीने कोरोनाबाधित असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याशिवाय रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन वरुण धवन, नीतू सिंह यांसह अनेकांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा