Advertisement

अमिताभ-आयुष्मान यांची 'गुलाबो सिताबो' अमेझॉन प्राइम होणार प्रदर्शित

कॉमेडी फिल्म 'गुलाबो सीताबो' आता सिनेमा हॉलऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येतोय.

अमिताभ-आयुष्मान यांची 'गुलाबो सिताबो' अमेझॉन प्राइम होणार प्रदर्शित
SHARES

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर कॉमेडी फिल्म 'गुलाबो सीताबो' आता सिनेमा हॉलऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येतोय. गुरुवारी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओनं जाहीर केलं की, १२ जून रोजी हा चित्रपट जगातील २०० देशांमध्ये प्रदर्शित होईल.

अ‍ॅमेझॉनने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "या १२ जून रोजी 'गुलाबो सीताबो'च्या जागतिक प्रीमिअरच्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी आम्हाला जॉईन व्हा." या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १७ एप्रिल ठरली होती. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉलिवूडचा एखादा चित्रपट थेट प्रदर्शित होत आहे.


अमिताभ यांनी केलं स्वागत

ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'गुलाबो सीताबो' प्रदर्शित होत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी स्वागत केलं आहे. रिलीजच्या तारखेची घोषणा करत त्यांनी ट्विटरवर लिहिलं की, "एका प्रतिष्ठित माणसाची आणि त्याच्या अनोख्या भाडेकरूची कहाणी... 'गुलाबो सीताबो'चा १२ जून रोजी प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होईल." या चित्रपटात अमिताभ लखनौच्या नवाबी जमीनदारांची भूमिका साकारत आहेत आणि आयुष्मान त्यांचा भाडेकरू झाला आहे.



आयुष्मान नाखुश?

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार आणि निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आयुष्मान खुरानाचं त्यांच्याशी एकमत झालं नाही. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याच्या बाजूनं तो होता.

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांना गुलाबो सीताबोकडून जास्त अपेक्षा होत्या. परंतु लॉकडाऊनमुळे सुजित सरकार यांना गुडघे टेकावे लागले आणि अखेर अ‍ॅमेझॉन प्राइमला चित्रपटाचे राईट्स विकावे लागले.

'गुलाबो सीताबो' या चित्रपटाआधी इरफान खानचा अंग्रेजी मीडियम देखील अमेझॉनवर दाखवण्यात आला होता. अंग्रेजी मीडियमला पाहिजे तसा प्रेक्षक वर्ग लाभला नाही. त्यामुळे आता 'गुलाबो सीताबो' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे लवकरच कळेल.  



हेही वाचा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा