Advertisement

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी पाहता येणार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘बेल बॉटम’ चा ट्रेलर अखेर रिलीज झालाय.

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी पाहता येणार
SHARES

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘बेल बॉटम’ चा ट्रेलर अखेर रिलीज झालाय. १९ ऑगस्ट २०२१ रोजी बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या दमदार ट्रेलरमुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

एका सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा असून भारतीय विमानाच्या अपहरणाचा थरार या सिनेमात पाहायला मिळणार आहे. भारतीय विमानाचं अपहरण झाल्यानंतर प्रवाशांच्या सुखरुप सुटकेसाठी सरकारकडून एका खास व्यक्तीकडे हे ऑपरेशन सोपवण्यात आलं होतं. ही खास व्यक्ती म्हणजेच अक्षय कुमार साकारत असलेली बेल बॉटमची भूमिका. या भूमिकेची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.

या सिनेमात पुन्हा एकदा अक्षय कुमारचा अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार म्हणजेच ‘बेल बॉटम’ आपल्या टीमच्या मदतीनं कशा प्रकारे हे ऑपरेशन हाताळतो आणि प्रवाशांची सुटका करतो याचाच शरार सिनेमात पाहायला मिळेत.

या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. येत्या काळात ‘सूर्यवंशी’, ‘पृथ्वी राज’, ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.हेही वाचा

प्रियंका चोप्राच्या रेस्टॉरंटची अमेरिकेत चर्चा, भारतीय पदार्थांसोबत मुंबईच्या वडापावचीही क्रेझ

'बचपन का प्यार' गाणारा सहदेव 'या' गायकासोबत झळकणार म्युझिक अल्बममध्ये

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा