Advertisement

सलमान खाननं बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीचं बर्फावर काढलं पेंटींग


सलमान खाननं बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीचं बर्फावर काढलं पेंटींग
SHARES

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ देखील झळकणार आहे. सलमान आणि कतरिना या जोडीला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा ही जोडी एकत्र आली आहे. चित्रपटासोबतच आणखी एका कारणास्तव ही जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

निर्मात्यांनी चित्रपटातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत कतरिना कैफचं बर्फावर सुंदर पेंटींग काढलेलं दिसत आहे. हे पेंटींग खुद्द सलमान खाननं काढलेलं आहे. 'टायगरनं बर्फावर झोयाचं पेंटींग काढून जणू तो क्षणच गोठवला आहे,' अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे.याशिवाय सलमान आणि कतरिनाचा आणखी एक फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. वोग मासिकेच्या कव्हर पेजवर सलमान आणि कतरिनाचा फोटो पाहायला मिळत आहे.वोगच्या कव्हर पेजसाठी सलमान आणि कतरिनानं नुकतंच फोटोशूट केलं. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.'टायगर जिंदा है' हा चित्रपट 'एक था टायगर'चा सिक्वल आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाचं कथानक जिथे थांबलं होतं तिथूनच 'टायगर जिंदा है'च्या कथानकाला सुरुवात होईल. चित्रपटात सलमान खान भारतीय गुप्तहेराची, तर कतरिना पाकिस्तानी गुप्तहेराची भूमिका साकारत आहे.

'टायगर जिंदा है' चित्रपटात प्रेक्षकांना दमदार अॅक्शनचा अनुभव घेता येईल. चित्रपटामध्ये अनेक साहसी दृश्य आहेत. या चित्रपटातील काही साहसी दृश्य स्वत: सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी केल्याचं बोललं जातं. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा