Advertisement

सैफ अली खानच्या 'कालाकांडी'चा ट्रेलर रिलीज


सैफ अली खानच्या 'कालाकांडी'चा ट्रेलर रिलीज
SHARES

सैफ अली खानचा आगामी चित्रपट 'कालाकांडी'चा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात सैफ अली खान वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. केसांच्या वेण्या, केसांना विचित्र कलर, रबर बँड आणि पेहराव यामुळे सैफ मजेशीर दिसत आहे. ट्रेलरमध्ये त्याचे विचित्र रूप पाहून नक्कीच तुम्हाला देखील हसू येईल.सैफला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्याचे आयुष्य कशाप्रकारे बदलते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सैफ अली खानसोबत अक्षय ओबेरॉय, दीपक डोबरियाल, कुणाल रॉय कपूर आणि अमायरा दस्तर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय वर्मा यानं केलं असून चित्रपटात शिव्यांचा अक्षरश: पाऊसच पडतोय. शिवाय चित्रपटात अनेक बोल्डसीन देखील आहेत. 

१२ जानेवारीला प्रदर्शित होणारा 'कालाकांडी' हा चित्रपट डार्क थ्रीलिंग कॉमेडीवर आधारित आहे. सैफ अली खाननुसार, कालाकांडी चित्रपट खूप मजेशीर आहे. मी या चित्रपटाचा भाग झाल्याचा मला आनंद आहे. दिग्दर्शक अक्षत वर्मा यांनी खूप चांगला चित्रपट बनवला आहे.सोमवारी या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला होता. पोस्टरवर सैफ अली खानचा विचित्र लूक पाहायला मिळत होता. या पोस्टरमध्ये मुंबईची झलक दाखवण्यात आली होती. त्यासोबतच सैफ अली खाननं पोस्टरमध्ये पांढऱ्या रंगाच्या शर्टवर पिवळा रंगाचा श्रग घातला आहे. सैफ अली खानचा लूक पाहनच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.


सैफ अली खान स्टारर 'रंगून' आणि 'शेफ' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाहीत. 'कालाकांडी'कडून सैफ अली खानला प्रचंड अपेक्षा आहेत. 'कालाकांडी' नंतर सैफ अली खानचा 'बाजार' हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा

लग्नाची खोटी बातमी ऐकून विरुष्कालाही फुटले असेल हसू


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा