Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
SHARES

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना स्ट्रेचरवरुन बाहेर आणण्यात आले. ते खूप अशक्त दिसले. त्यांना तोंडावर मास्क लावला होता.

यावेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो त्यांच्यासह दिसल्या. त्यांनी बाहेर हजर असलेल्या मीडियाला हात हलवून अभिवादन केले. यावेळी सायराजींनी दिलीप साहेबांच्या कपाळाचं चुंबन घेतलं.

दिलीप साहेब हे गेल्या पाच दिवसांपासून हिंदुजा रुग्णालयात दाखल होते. रविवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना बायलेटरल प्ल्यूरल इफ्यूजन झाले होते.

या आजारात छातीमधील फुफ्फुसांच्या चारही बाजुंनी पाणी जमा होते. त्याला वैद्यकीय भाषेत प्ल्यूरल इफ्यूजन म्हटले जाते. छातीत वारंवार पाणी भरल्यानं फुफ्फुसांवर दाब येतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. डॉ. जलील पारकर यांनी सांगितल्यानुसार, वाढत्या वयोमानानं हा त्रास होत असतो.

यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होतं ‘आम्ही रुग्णालयात केवळ रुटिन चेकअप करण्यासाठी आलो आहोत,’ असं सायरा बानो म्हणाल्या होत्या.हेही वाचा

अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २' चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होणार

विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंह’ ऑगस्टमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा