Advertisement

डॉक्टरांनी सांगितलं लता दीदींच्या निधनाचं कारण

नुकतेच ब्रीच कँडि रुग्णालयातील डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन घेत महत्त्वपूर्म माहिती दिली.

डॉक्टरांनी सांगितलं लता दीदींच्या निधनाचं कारण
SHARES

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

नुकतेच ब्रीच कँडि रुग्णालयातील डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन घेत माहिती दिली. डॉक्टरांनी माहिती दिली की, लता दीदींनी सकाळी ८.१२ वाजता अखेरचा श्वास घेतला. गेले २८ दिवस त्यांचा कोरोनाशी लढा सुरू होता. पण पोस्ट कोविडनंतर मल्टिपल ऑर्गन्स फेल झाल्यानं त्यांचं निधन झालं.

दरम्यान, लता दीदी यांचं पार्टीव १२.३० वाजता त्यांच्या प्रभूकुंज निवास्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ४ ते ६ या वेळेत शिवाजी पार्क इथं अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्टीव ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता शासकिय इतमामात त्यांच्यावर अंत्ससंस्कार होणार आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अनेक दशकांपासून संगीत जगताला आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे. लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आले, तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळाला. त्यांच्या आवाजातली शालीनता आणि गोडवा कधीही विरला नाही. त्यांच्या गाण्यांनी नेहमीच श्रोत्यांच्या कानांना मंत्रमुग्ध केले.

आजपर्यंतच्या कारकीर्दीत लतादीदींनी ७ दशकांमध्ये १००० हून अधिक हिंदी चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. तर ३६ हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केलं आहे.

२००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं होतं. याशिवाय, १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’, १९८९ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि १९९९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानंही त्यांना गौरविण्यात आलं होतं.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा