Advertisement

अरे... जरा शरम वाटू द्या


SHARES

मुंबई - देशात फक्त पाकिस्तानी कलाकारांबाबत चर्चा होते, शहीद जवानांबाबत चर्चा का होत नाही? अशी खंत अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केली आहे. यानिमित्तानं अक्षय कुमारने भारतीय सैनिकांचे जोरदार समर्थन केलं आहे. खंत असलेला व्हीडीओ अक्षयने सोशल वेबसाईट्सवर शेअर केला आहे. या व्हीडिओत तो म्हणाला की, ‘ काही दिवसांपासून माझ्या मनात याविषयी विचार सुरु आहे आणि ते मी व्यक्त करतो. त्यामुळे कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नाही…’

नेमकं काय म्हणाला अक्षय कुुमार

'आज मी तुमच्याशी एक स्टार किंवा अभिनेता म्हणून नाही, तर मी एक आर्मीमॅनचा मुलगा म्हणून बोलणार आहे. काही दिवसांपासून मी बघतो आहे, न्यूजचॅनेलवर आणि न्यूजपेपर मध्ये आपल्याच देशातील लोक एकमेकांसोबत वाद घालत आहेत.
कोण सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत आहे, तर कोण कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करत आहे. कोण घाबरत आहे की युध्द होईल का नाही ?अरे लाज बाळगा...

हा वाद नंतर घाला, आधी हे बघा कोणी तरी सीमेवर आपला जीव गमावत आहे. 19 जवान उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेत, एक 24 वर्षांचा जवान नितीन यादव बारामुल्लामध्ये शहीद झाला. त्याचे कुटूंब आणि आपल्या हजार जवानांच्या कुटुंबांची कोणाला चिंता आहे का?''

कोणता चित्रपट प्रदर्शित होतो का नाही किंवा कोणत्या कलाकारावर बॅन येतो का नाही? त्यांना फक्त एका गोष्टीची चिंता आहे, ती आहे त्यांचे भविष्य आणि आपल्याला चिंता आहे ती त्यांचे वर्तमान त्यांचे भविष्य चांगले झाले पाहिजे. ते आहेत म्हणून आज मी आहे. ते आहेत म्हणून आज तुम्ही आहात. ते नसतली तर हिंदुस्थानही नसेल.जय हिंद..

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा