Advertisement

कोलकाता नाइट राइडर्सची बंगालला कोट्यवधींची मदत


कोलकाता नाइट राइडर्सची बंगालला कोट्यवधींची मदत
SHARES

दोन वेळा आयपीएल विजेता असणाऱ्या शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनं अशी घोषणा केली आहे की, अम्फान चक्रीवादळानंतर झालेल्या अतोनात नुकसानानंतर ते 5 हजार झाडे लावणार आहेत. त्याचप्रमाणे केकेआरकडून पश्चिम बंगाल मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देखील मदत केली जाणार आहे.

गेल्या काही दशकांमधील सर्वात भीषण अशा या चक्रीवादळामुळे कोव्हिड-19 च्या संकटकाळात मोठे नुकसान झाले आहे. यामुळे लाखो लोकांवर परिणाम झाला असून ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

केकेआरचा मालक असणाऱ्या शाहरूख खाननं म्हटलं आहे की, या कठीण प्रसंगात तोपर्यंत आपण मजबूत राहणं आवश्यक आहे, जोपर्यंत पुन्हा एकदा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येत नाही. याप्रसंगी केकेआर मदत करण्यास बांधिल असल्याचंही तो म्हणाला.

शाहरूख पुढे म्हणाला की, केकेआरच्या ‘प्लांट ए 6’ उपक्रमाअंतर्गत ते स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोलकातामध्ये ५ हजार झाडं लावण्याची शपथ घेत आहेत. त्याचप्रमाणे केकेआरकडून चक्रीवादळामुळे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असणाऱ्या-कोलकाता, उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, पूर्व मिदनापूर याठिकामच्या गरजूंना रेशन आणि साफसफाईचे सामान देखील देण्यात येईल.



हेही वाचा

मुंबईहून बिहारला गेलेल्या गरोदर महिलेला झाला मुलगा, नाव ठेवलं सोनू सूद

किरण कुमारांचा तिसरा कोरोना रिपोर्ट आला समोर, कुटुंब अजूनही...

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा