Advertisement

मुंबईहून बिहारला गेलेल्या गरोदर महिलेला झाला मुलगा, नाव ठेवलं सोनू सूद


मुंबईहून बिहारला गेलेल्या गरोदर महिलेला झाला मुलगा, नाव ठेवलं सोनू सूद
SHARES

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अनेकांच्या कौतुकाचं कारण बनला आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू आणि त्याची टीम अतोनात प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे. त्याचप्रमाणे गरजूंना अन्नधान्य, रेशन देण्याचे कामही सोनू करत आहे. सोशल मीडियावर सोनूचे खूप कौतुक देखील होत आहे. 'रिअल हिरो' म्हणून त्याला संबोधलं जात आहे.

सोनूच्या मदतीनेच एक महिला बिहारमधील तिच्या गावी पोहोचली. ही महिला गरोदर होती आणि तिथं पोहोचल्यानंतर एकदम अनोख्या पद्धतीनं तिनं सोनूचे आभार मानले आहेत. सोनूनेच या घटनेसंदर्भात खुलासा केला आहे.

तो असं म्हणाला की, 'मी ज्या लोकांना त्यांच्या घरी पाठवलं आणि त्यातील एका महिलेनं बाळाला जन्म दिला आहे. तिनं माझ्या नावावर तिच्या मुलाचं नाव ठेवलं आहे. 'मी माझ्या टीमबरोबर मिळून १२ मजुरांच्या एका ग्रुपला मुंबईहून दरभंगासाठी पाठवलं होतं. ज्यामध्ये दोन गर्भवती महिला होत्या. यामधील एकीला तिथं पोहचल्यावर बाळ झालं आणि तिनं ही खूशखबर मला फोनवरून कळवली होती.'

सोनू पुढे म्हणाला की, 'तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं की मुलगा झाला आहे आणि त्याचे नाव सोनू सूद असं ठेवलं आहे. जेव्हा मी विचारलं सूद कसं काय तो तर श्रीवास्तव होईल ना? हे ऐकून ती महिला म्हणाली की मुलाचं पूर्ण नाव सोनू सूद श्रीवास्तव असं ठेवण्यात आलं आहे.'

सोनुचे काही प्रवाशांनी ट्विटरवर आभार देखील मानले. त्यांना उत्तर देण्याचं काम देखील सोनू करत आहे. एका युजरनं सोनूला टॅग करत असं लिहिलं आहे की, 'सर आम्ही व्यवस्थित निघालो आहोत. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला अपडेट करत राहीन. तुम्हाला खूप सारं प्रेम'. यावर सोनुनं रिप्लाय देखील दिला आहे. 'सांगितलं होतं ना उद्या आईच्या हातचं जेवण जेवशील. बिहारला पोहचून सर्वांना सलाम सांग', असा रिप्लाय सोनूनं दिला आहे.


हेही वाचा

किरण कुमारांचा तिसरा कोरोना रिपोर्ट आला समोर, कुटुंब अजूनही...

राम गोपाल वर्मांच्या 'कोरोना' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा