Advertisement

स्थलांतरीत मजुरांसाठी सोनू सूदचा 'टोल फ्री' नंबर

सोनू सूदनं आता एक टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. सोनू सुदनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

स्थलांतरीत मजुरांसाठी सोनू सूदचा 'टोल फ्री' नंबर
SHARES

कोरोनाच्या (Coronavirus Update) पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown in Mumbai) मुंबईत अडकलेल्या स्थलांतरीत आणि मंजूर वर्गासाठी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यानं स्वतंत्र बससेवा सुरु केली. सोनू सूदच्या टीमनं आतापर्यंत १२०० पेक्षा जास्त मजदुरांची घरवापसी केली आहे. विशेष म्हणजे, आम्ही हे काम शेवटच्या प्रवासी, मजूरापर्यंत सुरुच ठेवणार असल्याचं सोनुनं म्हटलं आहे.

सोनू सूदकडून मुंबईत अडकलेल्या आणि उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक किंवा इतर कुठल्याही राज्यात, संबंधित राज्य सरकारच्या परवानगीनं स्थलांतरित नागरिकांना घरी पोहचवण्याचं काम करण्यात येत आहे. त्यासाठी, सोनू सूदनं आता एक टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. सोनू सुदनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

सोनू म्हणाला की, माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, जर तुम्ही मुंबईत आहात आणि तुमच्या घरी जाऊ इच्छिता. तर, कृपया या 18001213711 टोल फ्री नंबरवरुन आमच्याशी संपर्क साधा. तुम्ही किती लोक आहात, कुठे आहात आणि कुठे जाऊ इच्छिता याबाबतची सविस्तर माहिती द्या. तुम्हाला माझी टीम शक्य ती सर्वच मदत करेल.

बॉलिवूडचा (Bollywood) सिंघम अजय देवगणनं देखील सोनूच्या या कामाचं कौतुक केलं आहे. एका युजरनं सोनू सूद सिंघमवाला काम कर रहे है.. अशा शब्दात सोनूचं कौतुक केलं आहे. 

सोनूच्या कामाला पब्लिसिटी स्टंट म्हणणाऱ्यांना सोनूनं चांगलंच उत्तर दिलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोनू म्हणाला की, "कुठल्याही पब्लिसिटीची मला गरज नाही. मी मजुरांची मदत करत आहे. हे तेच मजुर आहेत सध्या ज्यांच्या हाताला सध्या काम नाही. आई-वडील लहान लहान मुलांना घेऊन शेकडो किमी पायपीट करत निघाले आहेत. त्यांच्या वेदना त्यांनाच ठाऊक असणार आणि मी त्याच वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोणत्याही मीडिया पर्सनला मी बोलावले नाही. तुम्ही मजूरांची बस रवाना करा, तेव्हा आम्हाला बोलवा, असं अनेक मीडिया पर्सनचे मेसेज मला येतात. पण मी अशा कुठल्याही प्रसिद्धीच्या फंदात पडलेलो नाही. रोज शेकडो कॉल आणि मेसेज घरी जाण्यासाठी येत आहेत. मी एकटा हे सांभाळू शकत नसल्यामुळे एक टीम मी तयार केली आहे आणि हे सर्व काम ते सांभाळत आहे."



हेही वाचा

करण जोहरच्या घरातील दोघांना कोरोना, आई-मुलांसोबत झाला क्वारंटाईन

... म्हणून लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमार करतोय शूटिंग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा