Advertisement

... म्हणून लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमार करतोय शूटिंग

अभिनेता अक्षय कुमार जाहिरातीचं शूट करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण त्यामागे आहे हे कारण...

... म्हणून लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमार करतोय शूटिंग
SHARES

कोरोनाव्हायरसचा (Coronavirus Update) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कॉरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन देखील लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय, कार्यालयं बंद आहेत. बॉलिवूडचे (Bollywood) कामकाज देखील थांबले आहे. चित्रपट, मालिका, जाहिराती या सर्वांचं शूटिंग थांबलं आहे. पण अशात अभिनेता अक्षय कुमार  (Akshay Kumar) लॉकडाऊनमध्ये एका जाहिरातीचं शूटिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे.


अभिनेता अक्षय कुमार जाहिरातीचं शूट करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फिल्मफेअरच्या इन्स्टाग्राम पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अक्षय कुमारनं पुन्हा एकदा कामाला सुरूवात केल्याचं म्हटलं आहे. अर्थात हे सर्व योग्य ती परवानगी घेऊनच करण्यात येत आहे. याशिवाय सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.

फिल्मफेअरनं या सेटवरील एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. ज्यात सॅनिटायझर, मास्क, फेस शील्ड इत्यादी गोष्टी पुरवल्या जात असल्याचं दिसत आहे. तसंच हे संपूर्ण शूटिंग सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून केलं जात असल्याचं दिसत आहे.



फिल्मफेअरनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अक्षय कुमारसोबतचं त्याच्या 'पॅड मॅन' सिनेमाचे दिग्दर्शक आर बाल्की सुद्धा दिसत आहेत. तेच या जाहिरातीचं दिग्दर्शन करत आहेत. अक्षय कुमार शूट करत असलेली जाहीरात ही केंद्र सरकारच्या कोरोना विषयी जागरुकता मोहिम राबवण्यासाठी तयार केली जात आहे.



हेही वाचा

आयुष्मान-अमिताभ बच्चन यांची तू तू मैं मैं, 'गुलाबो सिताबो'चा ट्रेलर रिलीज

अनुष्का शर्मा अडचणीत, 'पाताल लोक' वेबसीरिज वादात


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा