Advertisement

करण जोहरच्या घरातील दोघांना कोरोना, आई-मुलांसोबत झाला क्वारंटाईन

आता बातमी येतेय की, ४८ वर्षीय निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या घरीदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

करण जोहरच्या घरातील दोघांना कोरोना, आई-मुलांसोबत झाला क्वारंटाईन
SHARES

कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये देखील कोरोनानं शिरकाव केला आहे. आता बातमी येतेय की, ४८ वर्षीय निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या घरीदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्याच्या घरात काम करणाऱ्या २ जणांना कोरोनाव्हायरसचं संक्रमण झाल्याची पुष्टी झाली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांनी त्यांचे घर आणि आसपासचा परिसरात जंतुनाशक फवारणी केली आहे.

खुद्द करण जोहर यांनी याची माहिती देत सांगितलं की, या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच त्या दोघांनाही इमारतीतच बनवलेल्या क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आलं आहे. यानंतर इमारतीत सेनिटायझेशन केलं गेलं. पालिकेनं सर्व खबरदारीचे उपाय केले आहेत.


धर्मा प्रॉडक्शनचे मालक करण जोहर यांनीही आपल्या उर्वरित घरातील माणसे स्वस्थ आणि सुरक्षित असल्याची माहिती दिली. सोमवारी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांच्या स्वॅब चाचण्या केल्या. सर्वांच्या चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. असं असलं तरीही  करण जोहर म्हणाले की, पुढील १४ दिवस कुटुंबातील सर्व सदस्य क्वारंटाईन राहतील.

यापूर्वी चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर बोनी कपूर आणि त्यांचे कुटुंब घरातच क्वारंटाईन झालं आहे.

आज करण जोहरनं आपला ४८ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या चाहत्यांनी आणि बॉलिवूड स्टार्सनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या खास प्रसंगी आलिया भट्टनं करणला एका वेगळ्याच शैलीत अभिनंदन केलं. तिनं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर करण जोहरचे एक चित्र शेअर केले आणि त्याचं मित्र, वडील आणि कुटुंबीय म्हणून वर्णन केलं.



हेही वाचा

या कारणामुळे किरण कुमार झाले घरातच क्वारंटाईन

... म्हणून लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमर करतोय शूटिंग

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा