Advertisement

प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांची कॅन्सरशी झुंज


प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांची कॅन्सरशी झुंज
SHARES

प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर सध्या 'बोन कॅन्सर' सारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. त्यांचा मुलगा टॉम जैमीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सप्टेंबरपासून 2016 पासून ते आजारी होते. आठवड्याभरापूर्वीच शरीर दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

चौथ्या स्टेजचा कॅन्सर

सैफी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना कॅन्सर असल्याचं निदान करण्यात आलं. त्यांना चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. टॉम यांना 'स्कवॉमस सेल कार्सिनोमा' नावाचा कॅन्सर झाला आहे. 



अशी घडली कारकिर्द

टॉम यांचा जन्म मसुरीमध्ये झाला. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून त्यांनी 1974 मध्ये डिप्लोमा केला आहे. टॉम यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1976 मध्ये आलेल्या चरस चित्रपटातून त्यांनी अॅक्टिंग करिअरला सुरुवात केली. पण टीव्ही सीरियल जुनूनमधल्या गँगस्टर केशव कलसी भूमिकेने ते सर्वाधिक प्रसिद्ध झाले. 

90च्या दशकात ही मालिका 5 वर्षे चालली होती. जबान संभालके, शक्तिमान कॅप्टन व्योम, हातीम अशा मालिकांमुळेही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. 1980 ते 1990 दरम्यान त्यांनी स्पोर्ट्स जर्नालिस्ट म्हणूनही काम केले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची टीव्हीवर मुलाखात घेणारे ते पहिले पत्रकार होते. अभिनय क्षेत्रातील कार्यासाठी 2008 साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले. 



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा