Advertisement

'पद्मावती'चे स्पेशल २६ कट्स!


'पद्मावती'चे स्पेशल २६ कट्स!
SHARES

बहुप्रतिक्षित आणि वादात अडकलेल्या संजय लीला भन्साली यांच्या 'पद्मावती' सिनेमाला सीबीएफसी म्हणजेच सेन्सॉर बोर्डानं ग्रीन सिग्नल दिला आहे. पण यासाठी चित्रपटात काही बदल करण्यात येणार आहेत. चित्रपटातील २६ सीन्सवर कात्री लावण्याचे निर्देश सेन्सॉर बोर्डानं दिले आहेत.

२८ डिसेंबरला सेन्सॉर बोर्डाने पद्मावतीच्या वादावर पडदा टाकण्यासाठी ६ सदस्यांची समिती तयार केली होती. या समितीमध्ये इतिहासकारांसोबतच राजघराण्यातल्या वरिष्ठांनाही सहभागी केलं होतं. या समितीनं २८ डिसेंबरला चित्रपट पाहिल्यानंतर काही दृश्यांवर आपत्ती व्यक्त केली. त्यानुसार सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटातील एकूण २६ दृश्यांवर कात्री लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



या अटींवर पद्मावती होणार प्रदर्शित


  • पद्मावती चित्रपटाचं नाव बदलून पद्मावत ठेवावं. कारण ज्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे तिचं नाव पद्मावत आहे.


  • चित्रपटाला U/A सर्टिफिकेट देण्यात येईल.


  • पद्मावती चित्रपटातील घुमर गाण्यात बदलाव करण्यात यावे.


  • सती प्रथेला चित्रपटात प्रमोट करण्यात येऊ नये.


  • चित्रपटात राणी पद्मावती (दीपिका पदुकोण) आणि अलाउद्दीन खिलजी (रणवीर सिंह) यांच्यातील आक्षेपार्ह दृश्यांवर कात्री लावण्यात यावी.


  • चित्रपटातील २६ दृश्यांवर कात्री लावण्यात यावी.

संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण कर्णी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर चित्रपटाची प्रदर्शन करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तारीख सध्या निश्चित नाही. जर संजय लीला भन्साळी यांनी सीबीएफसीच्या अटी मान्य केल्या, तर कदाचित जानेवारीत चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा