Advertisement

‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग अॅक्ट्रेस

प्रियंका प्रथम शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की, सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानचा ‘भारत’ सोडणं आणि तिच्या निक जोनससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत प्रियंका सतत चर्चेत राहिली. याच बळावर प्रियंका बॉलिवूडची सध्याची टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री बनली आहे.

‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग अॅक्ट्रेस
SHARES

काही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियंका चोप्राच्या पुढील बॉलिवूड प्रोजक्टविषयी मीडियामध्ये उत्सुकता होती. प्रियंका प्रथम शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की, सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानचा ‘भारत’ सोडणं आणि तिच्या निक जोनससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत प्रियंका सतत चर्चेत राहिली. याच बळावर प्रियंका बॉलिवूडची सध्याची टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री बनली आहे.


प्रियंका अग्रस्थानी

‘भारत’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सोशल मीडियावर प्रियंका चित्रपट सोडत असल्याची घोषणा करतानाच 'इन निक ऑफ टाइम' चा सूचक उल्लेख केला होता. त्यामुळे प्रियंका चर्चेत आली आणि ९४ गुणांसह स्कोर ट्रेन्ड्स इंडिया चार्टवर अग्रस्थानी पोहोचली.

स्कोर ट्रेंड्सचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात की, आपल्या वाढदिवसाच्या सुमारास भारतात परतलेली प्रियंका निक जोनससोबत गोव्यात फिरायला गेली. त्यानंतर प्रियंकाने शोनालीची फिल्म आणि सलमानसोबत ‘भारत’ सिनेमा करायचा निर्णय घेतला. यामुळे अर्थातच ती सतत बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियामध्येही चर्चेत राहिली. नंतर ‘भारत’ सोडल्यामुळे आणि साखरपुड्याच्या बातम्यांमुळे ती सतत ट्रेंड होत आहे. त्यामुळेच अचानक टॉप ट्रेडिंग अभिनेत्री बनलेली प्रियंका लोकप्रियतेत बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री झाली आहे.


काय आहे प्रक्रिया?

१४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करण्यात येतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदमच्या आधारे या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया केली जाते आणि त्यातून बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचलं जातं.


हेही वाचा -

प्रियंकाने निक जोनसशी केला साखरपुडा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा