Advertisement

पाहा, रीचाचा सिल्की लूक!


पाहा, रीचाचा सिल्की लूक!
SHARES

काही कलाकार नेहमीच धाडसी भूमिका साकारताना दिसतात. 'गँग्ज आॅफ वासेपूर', 'फुक्रे', 'मसान', 'गोलियों की रासलीला - रामलीला', 'लव्ह सोनिया' या चित्रपटांमध्ये नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री रीचा चढ्ढा सध्या अशा कलाकारांच्या यादीत आघाडीवर आहे. कायम आव्हानात्मक भूमिका साकारणाऱ्या रिचाचा नवा लूक सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.


रिचाचा नवीन लूक रिव्हील

'शकिला' या सिल्क स्मिथाच्या बायोपीकमधील रिचाचा नवीन लूक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. या पोस्टरवर दक्षिणात्य शैलीत अंगभर सोन्याचे दागिने परिधान केलेली रिचा दिसते. डोक्यापासून कमरेपर्यंतच्या या फोटोमध्ये रीचाने केसांपासून पोटापर्यंत विविध प्रकारचे दागिने परिधान केलेले आहेत. तिच्या पाठीमागे भिंतीवर स्मिथाला दूषणं देणारी वाक्यं लिहिलेली आहेत. या सर्वांवर मात करत तिने कशाप्रकारे चित्रपटसृष्टीत आपलं स्थान पक्कं केलं त्याची कहाणी 'शकिला'मध्ये पाहायला मिळणार आहे.


सिल्कचे बरेच चित्रपट हिट

अनेक उतार-चढाव आणि वादग्रस्त घटनांनी भारलेली सिल्क स्मिथाची कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपल्या मादक अदांमुळे कायम चर्चेत राहिलेल्या सिल्कचे बरेच चित्रपट हिट झाले होते. दक्षिणेत तिचा खूप मोठा चाहतावर्ग होता. तिचे चित्रपट दक्षिणात्य भाषांसोबतच इतर १६ भाषांमध्येही डब करण्यात आले होते. यात नेपाळी, चायनीज, सिंहली, रशीयन यांसारख्या इतर देशांमधील भाषांचाही समावेश आहे.


काय म्हणाली रिचा?

अशा एका अभिनेत्रीची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबाबत रीचा म्हणाली की, सिल्क स्मिथा हे एक आयकॅानीक नाव आहे. ९०च्या दशकातील तिची पॅाप्युलॅरीटी दृष्ट लागण्याजोगी होती. तिच्या चित्रपटांनी बॅाक्स आॅफिसवर तूफान कमाई केली. दुर्दैवाने तिचा दु:खद अंत झाला. हा चित्रपट म्हणजे तिला वाहिलेली श्रद्धांजली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा