Advertisement

सलमान खाननं राधे चित्रपटाचे अधिकार विकले २३० कोटींना

अभिनेता सलमान खाननं २०२० या वर्षातील सर्वात मोठी डील साइन केल्याची चर्चा आहे.

सलमान खाननं राधे चित्रपटाचे अधिकार विकले २३० कोटींना
SHARES

अभिनेता सलमान खाननं २०२० या वर्षातील सर्वात मोठी डील साइन केल्याचं वृत्त आहे. त्याने आपल्या आगामी ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचे सर्व अधिकार तब्बल २३० कोटींमध्ये ‘झी स्टुडिओज’ला विकले आहेत. कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाची ही आतापर्यंतची सर्वात महागडी डील असल्याचं बोललं जात आहे.

सलमानने संपूर्ण चित्रपट ‘झी स्टुडिओज’ला विकला आहे. ज्यामध्ये थिएटरचे अधिकार, ग्लोबल रिलीज, म्युझिक, ओटीटी आणि सॅटेलाईट हक्क पूर्णपणे ‘झी’ कंपनीला देण्यात आले आहेत. ‘झी’ कंपनीनेदेखील त्यांचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे डील असल्याचं म्हटलं आहे.

सलमाननं यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. आता मेकर्स पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. सलमानचा हा चित्रपट २३० कोटींहून अधिक व्यवसाय नक्की करेल, असा विश्वास ‘झी’ कंपनीनं व्यक्त केला आहे.

‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केलं आहे. चित्रपटात सलमानसह जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा हे देखील लीड रोलमध्ये दिसतील. 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' कोरियन फिल्म 'द आउटलॉज'चा हिंदी रिमेक आहे. 

सलमाननं काही दिवसांपूर्वीच 'अंतिम' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यात तो मेहुणा आयुष शर्मासोबत झळकणार आहे. यानंतर मार्चमध्ये सलमान 'टाइगर 3'च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा