Advertisement

संजय दत्तला यूएई सरकारकडून मिळाला गोल्डन व्हिसा

ही बातमी स्वतः संजय दत्तनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.

संजय दत्तला यूएई सरकारकडून मिळाला गोल्डन व्हिसा
SHARES

अभिनेता संजय दत्तला संयुक्त अरब अमिरातीनं घातलेल्या प्रवासी निर्बंधानुसार युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. ही बातमी स्वतः संजय दत्तनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. यासोबत त्याने एक फोटोदेखील शेअर केला आहे.

फोटोत दुबईचे जनरल डायरेक्टर ऑफ रेसीडन्सी अँड फॉरेन अफेअर्सचे डायरेक्टर जनरल मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री हे संजय दत्तला गोल्डन व्हिसा सोपवताना दिसत आहेत. यासह संजयनं युएई सरकारचे आभार देखील मानले आहेत.

संजय दत्तने फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'जीडीआरएफए दुबईचे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री यांच्या उपस्थितीत युएईचा गोल्डन व्हिसा स्विकारताना आनंद होतोय. हा सन्मान दिल्याबद्दल युएई सरकारचे खूप खूप आभार…फ्याय दुबईचे सीओओ हमद ओबैदल्ला यांचे देखील आभार.

२०२० मध्ये यूएई सरकारनं या व्हिसाची सुरुवात केली होती. युएईचा गोल्डन व्हिसा हा १० वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी मिळणारा व्हिसा आहे. भारतातल्या मेनस्ट्रीम कलाकारांपैकी अभिनेता संजय दत्त हा पहिला कलाकार आहे ज्याला युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे.



हेही वाचा

The Family Man 2 वरून वाद, तामिळनाडूत बंदी

हृतिक रोशन 'या' चित्रपटात साकारणार ४ वेगवेगळ्या भूमिका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा