Advertisement

सुशांत पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर

सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सुशांत सिंहला पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहाण्याची संधी मिळणार आहे. होय, त्यांचा केदारनाथ चित्रपट पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. त्याशिवाय पुढील चार चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहेत.

SHARES
01/5
सुशांत पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर
सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान स्टारर केदारनाथ पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हा चित्रपट पुढील आठवड्यात पुन्हा प्रदर्शित होणार आहे. सारा अली खाननं या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. या चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यात जवळीक वाढल्याची देखील चर्चा रंगली होती.
02/5
सुशांत पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर
घरगुती हिंसाचारावर आधारित थप्पड देखील पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ताप्सी पन्नू मुख्य भूमिकेत असून अभिनव सिन्हा यांनी दिग्दर्शन केले आहे.
03/5
सुशांत पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर
आयुष्मान खुरानाचे चित्रपट नेहमीच हटके असतात. त्यातील एक म्हणजे शुभ मंगल अधिक सावधान हा चित्रपट पुढील आठवड्यात पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समलैंगिकतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
04/5
सुशांत पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर
आयुष्मान खुरानाचे चित्रपट नेहमीच हटके असतात. त्यातील एक म्हणजे शुभ मंगल अधिक सावधान हा चित्रपट पुढील आठवड्यात पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समलैंगिकतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
05/5
सुशांत पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर
अजय देवगणच्या तानाजी या चित्रपटानं मल्टीप्लेक्सबरोबरच सिंगल स्क्रिनवर देखील चांगली कामगिरी दाखवली. आता हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात पुन्हा प्रेक्षकांसाठी रिलीज होणार आहे.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा