Advertisement

National Award - सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे' ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट

नितेश तिवारी दिग्दर्शीत आणि दिवंगत सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर अभिनीत 'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान मिळाला आहे.

National Award - सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे' ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
SHARES

सोमवारी ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात २०१९ मध्ये रिलीज चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला आहे. यात नितेश तिवारी दिग्दर्शीत आणि दिवंगत सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर अभिनीत 'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान मिळाला आहे.

याशिवाय, अभिनेत्री कंगना रनोटला 'मणिकर्णिका' आणि 'पंगा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगनाचा हा करिअरमधील चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

यापूर्वी तिला 'फॅशन' (2008)साठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस, 'क्वीन' (2014) साठी बेस्ट अॅक्ट्रेस आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' (2015)साठी बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आहे.

मागच्या वर्षी कोरोनामुळे राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली नव्हती. सोमवारी जाहीर झालेले पुरस्कार एक वर्ष उशीरानं घोषित होत आहे. हे पुरस्कार केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून जाहीर होत असतात. तसंच, या पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते केलं जातं.



हेही वाचा

रिंकू राजगुरू दाखवणार "आठवा रंग प्रेमाचा"

'कोण होणार करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा