Advertisement

'कोण होणार करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन

'कोण होणार करोडपती' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'कोण होणार करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन
SHARES

'कोण होणार करोडपती' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २०१९ मध्ये सोनी मराठी वाहिनीनं कोण होणार करोडपती केलं होतं. पण गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम करणं शक्य झालं नाही. त्यामुळे आता २०२१ मध्ये सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' घेऊन येत आहे. नुकतीच या शोची घोषणा करण्यात आली आहे.

ज्ञान तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचवू शकतं म्हणत यावर्षी कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. सचिन खेडेकर यांनी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचं देखील सूत्रसंचालन केलं होतं.

'कोण होणार करोडपती' ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. २४ मार्च ते २ एप्रिल यादरम्यान ८०८०० ४४ २२२ या क्रमांकावर मिसकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह अॅपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करून घेऊ शकतात.

कोण होणार करोडपती या रिएलिटी गेम शो ची जगभरात क्रेझ आहे. हा शो तब्बल १२० देशांमध्ये होतो. तसंच केवळ भारतामध्ये १० विविध भाषांमध्ये त्यांचे आयोजन केलं जातं. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि केबीसी हे भारतामध्ये जणू समीकरणच बनलेलं आहे. मराठी कोण होणार करोडपती हा शो यापूर्वी सचिन खेडेकर यांच्याप्रमाणेच दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते स्वप्नील जोशी यांनी देखील होस्ट केला आहे.



हेही वाचा

अमेझॉन प्राइम व्हिडिओ करणार मराठी चित्रपटाचा वर्ल्‍ड प्रिमिअर

"झॉलीवूड"चं पोस्टर लाँच

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा