Advertisement

"वाटेवरी मोगरा" सागरिकाचा नवा स्वरसाज

सागरिका म्युझिकच्या माध्यमातून वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर "लव्ह सॉंग फेस्टिव्हल "चा ग्रँड फिनाले रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

"वाटेवरी मोगरा" सागरिकाचा नवा स्वरसाज
SHARES

सागरिका म्युझिकच्या माध्यमातून वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर  "लव्ह सॉंग फेस्टिव्हल "चा ग्रँड फिनाले रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. निलेश मोहरीर यांनी "वाटेवरी मोगरा" या गाण्याची सुंदर रचना केली असून श्रीपाद जोशी या प्रतिभावान गीतकाराने या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.

वैशाली आणि स्वप्नील ने सागरिका म्युझिकसाठी आतापर्यंत १०० हून अधिक गाणं गायिली आहेत. त्यात हे गाणं पहिल्या १० मध्ये नक्कीच येईल. गाण्याचा ऑडिओ जर घरच्याच कलाकारांसोबाबत असेल तर व्हिडिओच्या बाबतीतही काही वेगळं नाही. या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन सागरिका दास यांनी केलं आहे 

गेल्या काही वर्षांमध्ये सागरीकाच्या अनेक व्हिडिओज मध्ये झळकलेली मानसी नाईक नवीन अवतारात "वाटेवरी मोगरा"मध्ये दिसणार आहे. मानसी नाईकचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे. नवीनच लग्न झालेल्या मानसी सोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा यात तिच्यासोबत असल्यामुळे हा म्युझिक व्हिडिओ अजूनच खास झाला आहे. 

१२ मार्चला सागरिका म्युझिकच्या मराठी यूट्यूब चॅनेलवर हे गाणं रिलीज झालं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा