Advertisement

शिवसेनेकडून जीवाला धोका असल्याचा कंगनाचा आरोप, सुप्रीम कोर्टात धाव

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत (Kangana ranaut) आणि तिची बहिण रंगोली चंडेल (rangoli chandel) यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

शिवसेनेकडून जीवाला धोका असल्याचा कंगनाचा आरोप, सुप्रीम कोर्टात धाव
SHARES

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत (Kangana ranaut) आणि तिची बहिण रंगोली चंडेल (rangoli chandel) यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये दाखल करण्यात आलेले तिन्ही खटले हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात हलवण्यात यावे, अशी मागणी कंगनानं केली आहे.

शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा कंगना रणौतनं केला आहे. कंगनावर तीन खटले सुरू आहे. वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी कंगनावर खटला सुरू आहे.

अली काशिफ खान आणि मुनव्वर अली सय्यद यांनी दोन खटले दाखल केले आहेत. यामध्ये कंगनाच्या ट्वीटमुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण केला जाण्याचा आरोप करण्यात आला आहे. तर तिसरा खटला हा गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केला आहे.

जुहू पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तक्रार केली होती. कंगनानं मानहानी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. एका मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कंगना आणि रंगोलीनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. जर मुंबई या प्रकरणाची सुनावणी सुरू राहिली तर शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे या तिन्हा प्रकरणावरील सुनावणी ही हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात व्हावी, अशी मागणी कंगनानं या याचिकेतून केली आहे. अद्याप ही याचिका स्वीकारण्यात आलेली नाही.

कंगना आणि तिची बहिण रंगोलीनं अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बरीच ट्वीट केली होती. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीनं वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयानं कंगनाविरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणं आणि धार्मिक भावना भडकावणं या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते.



हेही वाचा

कंगना रणौत विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

शाहिद कपूर साकारणार आणखी एक ऐतिहासिक भूमिका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा