Advertisement

कंगना रणौत विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

कंगनाच्यावतीनं तिचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी कोर्टाला सांगितलं की, कंगना ही सध्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तसंच काही वैयक्तिक कारणास्तव ती सुनावणीस हजर राहू शकली नाही.

कंगना रणौत विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी
SHARES

अभिनेत्री कंगना रनौतविरोधात अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कोर्टानं कंगनाला १ मार्चच्या सुनावणीत हजर राहण्याचं समन्स जारी केलं होतं. मात्र, कंगना या सुनावणीस गैरहजर राहिली. त्यामुळे कोर्टानं कंगनाविरोधात ही कारवाई केली आहे. 

कंगनाने नुकत्याच दिलेल्या काही मुलाखतींमध्ये आपली बदनामी केली असल्याचा दावा जावेद अख्तर यांनी केला आहे. जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरीच्या न्यायालयात हा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. कंगनाच्यावतीनं तिचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी कोर्टाला सांगितलं की, कंगना ही सध्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तसंच काही वैयक्तिक कारणास्तव ती सुनावणीस हजर राहू शकली नाही. 

या सुनावणीसाठी जावेद अख्तर वेळेपूर्वीच आपल्या वकिलासोबत न्यायालयात हजर  होते. मात्र, कंगनाने न्यायालयात हजरी न लावल्यानं महानगरदंडाधिकाऱ्यांनी कडक पावलं उचलंत कंगनाविरोधात जामीनात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे कंगनापुढे यासंदर्भात आता अंधेरी दंडादिकारी कोर्टात हजर राहून रितसर जमीन घेणं किंवा या वॉरंटच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान देणं हे दोन कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. या प्रकरणी पुढची सुनावणी २६ मार्चला होणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा