Advertisement

शाहिद कपूर साकारणार आणखी एक ऐतिहासिक भूमिका

ताज्या रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूर ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार आहे.

शाहिद कपूर साकारणार आणखी एक ऐतिहासिक भूमिका
SHARES

शाहिद कपूरनं राज अँड डीकेच्या आगामी वेब सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. या माध्यमातून शाहिद आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकणार आहे. आता ताज्या रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूर ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार आहे.

दीपिका पदुकोण स्टारर फिल्म 'पद्मावत' या चित्रपटात शाहिदनं महाराजा महारावल रतन सिंगची भूमिका साकारली होती. आता शाहिद कपूर आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत दिसू शकतो. रिपोर्टनुसार, 'कबीर सिंह' या चित्रपटाचे निर्माता अश्विन वर्दे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी लाइका प्रॉडक्शनसोबत हातमिळवणी केली आहे.

मुख्य भूमिकेसाठी त्यांनी शाहिद कपूरकडे संपर्क साधला आहे. शाहिदला चित्रपटाची कल्पना आवडली आहे. पण अद्याप त्यानं निर्मात्यांना आपला होकार कळवला नाही. हा चित्रपट बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट असणार आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी अनेक निर्मात्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची योजना आखली आहे. अभिनेता रितेश देशमुखनं काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटात रितेश स्वतः मुख्य भूमिका साकारणार आहे.

याशिवाय अली अब्बाज जफर हेदेखील सलमान खानला मुख्य भूमिकेत घेऊन छत्रपतींच्या जीवनावर चित्रपट बनवणार असल्यानं चर्चेत आहेत. मात्र आतापर्यंत यापैकी कोणताही चित्रपट फ्लोअरवर आलेला नाही. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष अश्विन वर्देंकडे लागले आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा