Advertisement

तांडवसाठी अॅमेझॉन प्राईमला मागावी लागली माफी

अखेर अ‍ॅमेझॉन प्राईमनं सद्य प्रकरण अधिक न ताणता प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

तांडवसाठी अॅमेझॉन प्राईमला मागावी लागली माफी
SHARES

सैफ अली खानची (Saif Ali Khan) ‘तांडव’ (Tandav) ही वेब सीरिज प्रदर्शित होताच ही सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली. यामधील काही दृश्यांवर प्रेक्षकांनी जोरदार टीका केली. या सीरिजमधील दृश्यांमुळं हिंदू देवतांचा अपमान केला जातोय असाही आरोप करण्यात आला होता.

तांडवमुळे सुरू झालेला हा वाद अखेर न्यायालयात पोहोचला. मात्र सर्वोच्च न्यायालयानं देखील अॅमेझॉन प्राइमच्या कॉन्टेंट हेड अपर्णा पुरोहित यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलंली आहे. अखेर अ‍ॅमेझॉन प्राईमनं सद्य प्रकरण अधिक न ताणता प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

अ‍ॅमोझॉन प्राईमनं सोशल मीडियाद्वारे हा माफीनामा जाहिर केला आहे. “नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तांडव वेब सीरिजमधील काही दृश्य प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटली यासाठी आम्ही माफी मागतो. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही ही आक्षेपार्ह दृश्य काढून टाकत वेब सीरिज पुन्हा प्रदर्शित केली आहे. प्रेक्षकांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक भावनांचा आम्ही आदर करतो. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दलही आम्ही क्षमस्व आहोत. आम्ही भारतीय न्याय व्यवस्थेचाही आदर करतो तसचं यापुढेदेखील आम्ही भारतीय कायद्याचं पालन करु.” अशा आशयाचा माफीनामा अ‍ॅमोझॉन प्राईमनं दिला आहे.

जानेवारी महिन्यात अ‍ॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘तांडव’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजला सर्व स्तरांमधून होत असलेला विरोध लक्षात घेता दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी देखील ट्विट करुन माफी मागितली होती. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. काही प्रेक्षकांनी तर या सीरिजवर बंदी घालण्याची देखील मागणी केली आहे.हेही वाचा

शिवसेनेकडून जीवाला धोका असल्याची कंगनाचा आरोप, सुप्रीम कोर्टात धाव

राजकारणात होणारे डावपेच लवकरच ‘खुर्ची’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा