Advertisement

'सूर्यवंशी'चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

'सूर्यवंशी'चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर
SHARES
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे 'सूर्यवंशी' चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 सूर्यवंशी ३० एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. मात्र महाराष्ट्रात लागू झालेल्या रात्रीची संचारबंदी, विकेंड लॉकडाउनचा फटका चित्रपटाच्या कमाईवर होणार असल्याने निर्मात्यांनी 'सूर्यवंशी' प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट मागील वर्षी २४ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाऊनमुले प्रदर्शन लांबणीवर टाकलं होतं.  त्यानंतर पुन्हा  दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची चर्चा होती. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांचा 'चेहरे' आणि यशराज चोप्रा फिल्म्स यांचा 'बंटी और बबली' या चित्रपटांचं प्रदर्शन थांबवण्यात आलं आहे.

आता एप्रिल महिन्यात फक्त दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूज यांचा 'द बिग बुल' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत चा 'थलाइवी' चित्रपट आहे.हा चित्रपट २३ एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. 'सूर्यवंशी' च्या प्रदर्शित न होण्याने अक्षयच्या पुढील चित्रपटांवर त्याचा जास्त परिणाम होणार आहे. अक्षयचे ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘बेल बॉटम’ आणि ‘बच्चन पांडे’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत.

हेही वाचा

'हे' १३ सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात

बापरे! अक्षय कुमारनंतर तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा