Advertisement

उर्मिला मातोंडकर यांच इन्टाग्राम अकाऊन्ट हॅक


उर्मिला मातोंडकर यांच इन्टाग्राम अकाऊन्ट हॅक
SHARES

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती स्वतः उर्मिला मातोंडकर यांनी ट्विरटच्या माध्यमातून दिली. या प्रकरणी उर्मिला यांनी महाराष्ट्र सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.

 

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकतीच उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बाधून शिवसेनेत प्रवेश केला. उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या १२ राज्यपाल निर्वाचित जागेसाठी पाठवण्यात आलं आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पण शिवसेनेत पक्ष प्रवेश झाल्यापासून उर्मिला यांनी पक्षाच्या कामाला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उर्मिला आणि कंगना रनौत यांच्यामध्ये ट्वीटर वर काही विषयावरून ट्विटर वॉर रंगलेलं पहायला मिळालं होतं. त्यानंतर केंद्र सरकारने संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द केलं त्यावरून उर्मिला यांनी टीकास्त्र डागत ‘राज्यात जेव्हा निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी मोठ्या सभा घेण्यात आल्या. म्हणजे संसद वगळता सर्व देश आता अनलॉक आहे. खूपच लोकशाही आहे. टू मच डेमोक्रॉसी असा हॅशटॅग यामध्ये होता. या प्रकरणी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली असल्याचे कळते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा