Advertisement

प्रियंका चोप्राच्या रेस्टॉरंटची अमेरिकेत चर्चा, भारतीय पदार्थांसोबत मुंबईच्या वडापावचीही क्रेझ

आपल्या मुंबईची शान म्हणजे आपला आयकॉनिक वडा पाव अनेक हॉलिवूड सेलिब्रिटिंच्या पसंतीस उतरत आहे.

प्रियंका चोप्राच्या रेस्टॉरंटची अमेरिकेत चर्चा, भारतीय पदार्थांसोबत मुंबईच्या वडापावचीही क्रेझ
SHARES

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील वर्चस्व गाजवतेय. फक्त चित्रपटातच नाही तर ती आता रेस्टॉरंट व्यवसायातही आपलं नाव कमावत आहे. नुकतंच तिनं अमेरिकेत भारतीय रेस्टॉरंट सुरु केलं. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ आहे. हे रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये आहे.

प्रियंकाच्या या रेस्टॉरंटमध्ये भारतीय पदार्थ देखील चाखता येणार आहेत. तिच्या या रेस्टॉरंटमध्ये भारतात लोकप्रिय असलेले पदार्थ म्हणजे पाणीपुरी, डोसा, कुल्चा देखील खाता येणार आहेत. विशेष म्हणजे हे भारतीय पदार्थ परदेशी खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत. 

प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. आता त्यात आणखी एका सेलिब्रिटीच नाव समोर आलं आहे. लोकप्रिय निर्मात्या आणि थेटरसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोला जेम्स यांनी देखील आता प्रियांकाच्या सोना या रेस्टॉरंटला भेट दिली आहे.


लोला यांनी अलीकडेच प्रियांका चोप्राच्या रेस्टॉरंटला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या मुंबईची शान म्हणजे आपला आयकॉनिक वडा पाव खाल्ला. याशिवाय लोलानं भेळ, चाट आणि बरेच पदार्थ खाल्ले. या विषयी सांगत लोलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.

‘यात आश्चर्य नाही न्यूयॉर्कमध्ये असलेलं हे सोना अप्रतिम आहे. या रुचकर आणि चविष्ट जेवणाकडे एकदा नजर टाका,’ अशा आशयाचे कॅप्शन लोलाने हे फोटो शेअर करत दिले आहे. प्रियांकाच्या सोनामध्ये एका वडा पाव खाण्यासाठी १४ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास १ हजार रुपये मोजावे लागतात.हेही वाचा

'बचपन का प्यार' गाणारा सहदेव 'या' गायकासोबत झळकणार म्युझिक अल्बममध्ये

...आणि मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा