Advertisement

विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंह’ ऑगस्टमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

सिनेमाच्या निर्मात्यांनी याच वर्षी १५ जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.

विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंह’ ऑगस्टमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
SHARES

अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘सरदार उधमसिंह’ सिनेमानं आता ओटीटीकडे पाऊल टाकले आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी याच वर्षी १५ जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. अखेर निर्मात्यांनी हा सिनेमा आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर या वर्षी ऑगस्टमध्ये महिन्यात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेड विश्लेषक अरुण मोहन सांगतात, शूजित सरकारने आपला ‘गुलाबो सिताबो’देखील ओटीटीवर रिलीज केला होता. त्यांनीच थिएटरमध्ये मोठ्या सिनेमांच्या प्रदर्शनाची चेन मोडली होती.

त्यांचे हे डिजिटल वळण आमच्यासाठी फायद्याचे ठरले. अशात त्यांनी ‘सरदार उधम सिंह’ डिजिटलवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला असेल तर विचार करूनच घेतला असेल.

गेल्या दोन वर्षांपासून टीम या सिनेमावर काम करत आहे. गेल्यावर्षीच तो प्रदर्शित होणार होता, मात्र तसं झालं नाही. आजची परिस्थिती पाहता पुढचे ६ महिन्यांपर्यंतदेखील थिएटर उघडण्याचे काही संकेत दिसत नाहीत. आपली गुंतवणूक पाहता निर्मात्यांनी जास्त वाट बघणं योग्य नाही.

विकी कौशलचा हा सिनेमा क्रांतिकारी सरदार उधम सिंह याचा बायोपिक आहे. त्यांनी ब्रिटिश इंडियाचे पूर्व लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायरची ब्रिटनमध्ये हत्या केली होती. 

जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी उधमसिंह यांनी हत्या केली होती. जनरल ओडवायरनेच या हत्याकांडाचा आदेश दिला होता आणि ते जनरल डायरनं पूर्ण केलं होतं.



हेही वाचा

संजय दत्तला यूएई सरकारकडून मिळाला गोल्डन व्हिसा

आयफोनवर चित्रित पहिला मराठी चित्रपट, MX Player वर होणार प्रदर्शित

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा