Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत 1150 नवे रुग्ण, दिवसभरात 53 जणांचा मृत्यू

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 45 हजार 854 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात करोनाचे 699 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Coronavirus pandemic:  मुंबईत 1150 नवे रुग्ण, दिवसभरात 53 जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे 139 जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात 1150 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत  शुक्रवारी   दिवसभरात 53 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 48 रुग्ण दगावले आहेत. तर 1 जून रोजी 40 मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी 2 जून रोजी रोजी एकूण 49 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 1150 नवीन रुग्ण आढळले आहेत.


मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 45 हजार 854 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात  करोनाचे 699 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण 18 हजार 797 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

विभागानुसार रुग्णांची संख्या

एच पूर्व – वांद्रे पूर्व -  1148 

के पश्चिम – अंधेरी, विलेपार्ले पश्चिम  -1273

के पूर्व – अंधेरी, विलेपार्ले पूर्व -1416

एल – कुर्ला -1488

ई – भायखळा, नागपाडा, मुंबई सेंट्रल -1455

एफ दक्षिण -परळ,  लालबाग, शिवडी -1409

एस – भांडुप, विक्रोळी -1276

एन – घाटकोपर, विद्याविहार -1230

एफ उत्तर – शीव, वडाळा, अ‍ॅण्टॉप हिल -1504

अतिदक्षता विभागातील(ICU) व्यवस्था - 645

व्हेंटिलेटरवर व्यवस्था-  373

सीसीसी 2 मधील व्यवस्था - 29740

डायलसिस उपकरणे - 92


मुंबईतील कंटेनमेंट झोनची माहिती

कंटेनमेंट झोन (चाळ आणि झोपडपट्टी) - 700

सीलबंद इमारती - 3110

अती जोखीम - 8864

कमी जोखीम 18, 861

सीसीसी 1 मधील अति जोखीम संपर्क - 59, 193


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा